Ad will apear here
Next
‘जागतिक शैक्षणिक गुणवत्तेत ‘डीकेटीई’ अव्वल’
जपानचे कॅनिचरो कॅम्बे यांचे गौरवोद्गार


इचलकरंजी : ‘आधुनिक डिजिटलायझेशन युगात ‘डीकेटीई’ने शैक्षणिक क्षेत्रात दिलेली सेवा, संशोधन व विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर केलेले शैक्षणिक कार्य यांमुळे आज ‘डीकेटीई’चा ब्रँड अधोरेखीत होत आहे,’ असे गौरवोद्गार ‘किर्लोस्कर-टोयाटा’चे सीओओ कॅनिचरो कॅम्बे यांनी काढले.

‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटचे ‘जोश २०१९’ हा ३७वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘डीकेटीई’ने २० हून अधिक जागतिक विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत. यामुळे येथील विद्यार्थ्यांना परदेशातून पदवी मिळत असून, याकराराअंतर्गत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक जागतिक ट्रेनिंग, तंत्रज्ञान व यंत्रसामुग्रीचा अभ्यास करण्याची संधी मिळत आहे व जगात चाललेल्या घडामोडीचे ज्ञान अवगत होत आहे.

‘‘डीकेटीई’तील शिक्षणाची पद्धत, संशोधन व उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री यांमुळे येथील विद्यार्थ्यांना जगातील सर्व तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळत आहे. येणाऱ्या काळात जपानच्या शिक्षणातदेखील ‘डीकेटीई’च्या ज्ञानाचा उपयोग होईल,’ असा विश्‍वास या वेळी कॅम्बे यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणात हा जोश कायम ठेऊन आपल्या ज्ञानाचा व संशोधनाचा फायदा देशासाठी करण्याचे आवाहन केले. कॅनिचिरो कॅम्बे यांनी पुढाकार घेऊन इचलकरंजीमध्ये टोयोटा लूमचे उत्पादन चालू करावे व येथील उदयोग वाढीस चालना देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी स्वागत केले. डे. डायरेक्टर (शैक्षणिक) प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे व डे. डायरेक्टर (प्रशासकीय) प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांनी विविध उपक्रम व स्पर्धांचे निकाल जाहीर केले. विद्यार्थी प्रतिनिधी अतुल कांबळे याने वार्षिक सोशल रिपोर्ट सादर केला. श्रुतिका म्हतुकडे या विद्यार्थिनीने ‘अंबर’ या नियतकालिकाबद्दल माहिती दिली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘अंबर’चे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेच्या मानद सचिव डॉ. एस. यू. आवाडे, स्वानंद कुलकर्णी यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. ए. व्ही. शहा, प्रा. अजित बलवान व प्रा. ए. यू. अवसरे यांनी संयोजक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्थ मर्दा, धनश्री जोशी, ऋषिकेश भत्तड, सोनल उरणे व क्षितिजा कांबळे यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी बाळकृष्ण पोईपकर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZIXBY
Similar Posts
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
‘डीकेटीई’चा ‘हॅपेसेन-व्हिएतनाम’शी सामंजस्य करार इचलकरंजी : विद्यार्थी कल्याणासाठी व उद्योजकतेला देण्याच्या हेतूने डीकेटीईचा व्हिएतनाम देशातील हॅपेसेन या कंपनीशी सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांना या कंपनीच्या माध्यमातून डीकेटीईमध्ये सुरू असलेल्या फॉरेन कोट्याअंतर्गत शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
रेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या ड्रिफ्टर्स संघाने ‘राष्ट्रीय अ‍ॅटो इंडिया रेसिंग चॅंपियनशिप २०१८’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. विविध राज्यांतील सुमारे ७०हून अधिक संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता
‘डीकेटीई’च्या ३५ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीत निवड इचलकरंजी : डीकेटीई संस्थेच्या इंजिनीअरिंग विभागामध्ये कॅपजेमिनी या कंपनीने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संस्थेच्या सर्वाधिक ३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language